महाराष्ट्र संगणक व शैक्षणिक विकास केंद्र (MCADC) ची २००० साली स्थापना करून सर्व प्रथम राज्यातील टाइपराइटिंग संस्थांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) लघुलेखन व संगणक अभ्यासक्रम राबविले. केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश कराळेसर यांनी हा उपक्रम राबवत असतानाच, MSCEIA या राज्यातील टंकलेखन, लघुलेखन (GCC-TBC) संस्थांच्या शिखर संघटनेचे अध्यक्षपदावर विराजमान होऊन २००७ ते २०१८ या कालावधीत संपूर्ण राज्यात टंकलेखन, लघुलेखन अभ्यासक्रमात अनेक बदल घडवून आणत पारंपारिक संगणक टंकलेखणाची (GCC-TBC) जोड देण्याचे काम २०११ पासून सुरु केले व प्रत्यक्षात २०१८ ला पूर्णत्वास नेले. आज महाराष्ट्र राज्याच्या ३५०० टंकलेखन संस्थांमध्ये, GCC - TBC अभ्यासक्रम सुरु झाल्याचा मनस्वी आनंद आहे. इतक्या वरचं न थांबता संगणक टंकलेखनाच्या परिपूर्ण ऑनलाईन परीक्षा यशस्वी करण्यात महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थाची संघटना (MSCEIA) च्या संपूर्ण कार्यकारिणी, सर्व जिल्हा संघटना, अनेक संगणक तज्ञांनी योगदान दिल्याने हा बदल तयशस्वी झाला. खऱ्या अर्थाने या बदलात माजी शिक्षणमंत्री राजेंद्र बाबूजी दर्डा, तत्कालीन शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात व माजी शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांची प्रेरणा व संकल्पना कामी आली. यातच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCEIA पुणे) च्या संगणक टंकलेखन गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्पुटर टायपिंग बेसिक कोर्से (GCC - TBC) मराठी, हिंदी, इंग्रजी ३०/४० श.प्र.मी. संगणक टंकलेखन GCC - TBC, या अभ्यासक्रमात MS-CIT (महाराष्ट स्टेट इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी) या अभ्यासक्रमाची समकक्षता देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन दिनांक १६ जुलै २०१८ संगणक अहर्ता देणे बाबतचा निर्णय प्रसिद्ध होऊन GCC - TBC वाटचालीचे ऐतिहासिक काम पूर्णत्वास नेले. संगणक टंकलेखनाचा स्विकार करून "समय के साथ चलो" संगणक टंकलेखन एक पाऊल पुढे महाराष्ट्र राज्याचे प्रगतीकडे या उक्तीचा स्विकार करून महत्वपूर्ण काम केले आहे.

महाराष्ट्र संगणक या यशस्वी उपक्रमानंतर महाराष्ट्र राज्यातील हजारो संस्थानां संगणक कोर्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतानाच महाराष्ट्र संगणक व शैक्षणिक विकास केंद्र (MCADC) च्या माध्यमातून महा संगणकाचे जनक डॉ. विजयजी भटकर सर आणि राज्याचे माजी शिक्षण संचालक महावीर माने, माजी शिक्षण संचालक बा. का. पाटील, महाराष्ट्र राज्याचे पोलीस मित्र दादासाहेब गायकवाड आणि संगणक अभियंता अमित माने या मान्यवर सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली ETH Research Lab - Joint Program च्या माध्यमातून राबविण्यात येणारे सावित्रीबाई फुले विद्यापीठ संगणकाचे अभ्यासक्रम राबविण्याचे तसेच महाराष्ट्र राज्यात डिजीटल स्कूल हा उपक्रम राबवण्यासाठी ETH ने MCADC ची नेमणूक केली आहे.

पदमभूषण विजयजी भटकर सर यांचे सन २०१८ पासून प्रगत महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठीही MCADC ची सन २०१८ पासून नियुक्ती झाली आहे. हा डिजिटल प्रोजेक्टही संपूर्ण राज्यात मार्गदर्शक मान्यवर व MCADC चे संस्थापक सदस्य व MSCEIA चे समस्त राज्य कार्यकारिणी, MCADC चे जिल्हा समन्वयक आणि डिजीटल स्कूलच्या MCADC चे प्रतिधींनी मार्फत २०१८ पासून सुरु केला आहे. डॉ. विजयजी भटकर सर, शिक्षण संचालक महावीर माने साहेबांचे ग्रामीण भागातील शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमात सहभागी होऊन डिजिटल महाराष्ट्र व डिजिटल इंडिया उपक्रमात सहभागी होऊया. अधिक माहितीसाठी www.mcadc.ineth.co.in या वेबसाईटला भेट दया.

" शिकवा कमवा स्वावलंबी होऊ या,
या उपक्रमात सहभागी होऊ या "